Breaking

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

*२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन*


राष्ट्रीय विज्ञान दिन


खंडेराव पार्वतीशंकर हेरवाडे,शिरोळ
ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते


       मानवाच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना आज सारा देश सलाम करीत आहे. राष्ट्रीय व जागतिक विज्ञान दिन आत्मचिंतन व कृतीची गरज. आपण २१ व्या शतकात पदार्पण केले आहे विज्ञानाने केलेली प्रगती कालची व आजची कशी आहे. येणाऱ्या काळात विज्ञानाची झेप कशी असणार आहे याचा अंतर्मुख होऊन विचार करणे तशा प्रकारची वैज्ञानिक जाणीव चिकित्सकवृत्ती निर्माण होणे ही आजची खरी गरज आहे. 

       एकीकडे विज्ञान श्रेष्ठ आहे असे म्हणत असतानाच समाजात भोंदू बाबांवर विश्वास ठेवणारे लोक वाढत आहेत. दुसऱ्या बाजूला वैद्यकीय क्षेत्रात इतकी प्रगती झाली असताना हे लोक दैवी उपचाराकडे वळत आहेत. चमत्कार होण्यामागे विज्ञान आहे. आज विज्ञानदिन साजरा करताना जुने विचार, अंधरूढी मुळातून नष्ट करण्याची केवळ प्रतिज्ञा न करता कृती करुया. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागील कार्य कारण भाव शोधण्यासाठी चिकीत्सक बनूया, भोंदू बाबा चमत्कार, करणी, भानामती इ. गोष्टी थोतांड आहेत हे कृतीतुन पटवून देण्याची राष्ट्रीय व जागतिक विज्ञानदिनी प्रतिज्ञा करूया. अज्ञान, अंधश्रध्दा, दारिद्र्य व निरक्षरता यांच्यात अडकलेल्या भारतीय समाजाला विज्ञानाभिमुख करण्यासाठी व मानव कल्याणासाठी विज्ञान प्रभावी पणे लोकांपर्यंत पोहोचायला हवे या कार्यासाठी सर्वांनी झटायला हवे. वस्तू निष्ठता व वैज्ञानिकदृष्टीकोन वाढीस लावणे या उद्दीष्ठांनी कार्यरत राहिल्यास विज्ञानदिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.


) ज्ञान ही शक्ती आहे विज्ञान प्रगती बनवते 

२) विज्ञानाचे डोळ्यात घालावे अंजन अंध्दश्रध्देचे करा समुळ उच्चाटन

 ३) स्वंयघोषित बाबा अवताराचे करू दहन समाजघातक रूढी टाकू गाढून

 ४) निर्भयपणे जगाला सांगा सत्यवचन, सत्यासाठी प्रसंगी वेचू पंचप्राण 

५) बुडीतासाठी करा भाषण, करा लेखन, घुमवूया घोष 

        जय विज्ञान..... जय विज्ञान....... जय विज्ञान.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा