कालवश विठ्ठलराव नाईक निंबाळकर |
*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य शिरोळ तालुका भाजप अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वडील विठ्ठलराव नाईक निंबाळकर वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
निधनाची बातमी कळताच नागरिकांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. विठ्ठलराव नाईक निंबाळकर हे कोरोनामुळे तीन आठवड्यापासून कोल्हापूर येथील अँस्टर आधार रुग्णालयात उपचार घेत होते. कोरोना आजारातून ते बाहेरही पडले होते. मात्र फुफ्फुसातील बिघाडामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही.
आज सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच यड्राव गावावर शोककळा पसरली. गावातील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे व त्यांच्या घराशेजारी शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या कारकीर्दीत विविध संघटनेच्या व संस्थेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात सामाजिक व भरीव कामे केली होती. एक उत्तम नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होते. विठ्ठलराव नाईक निंबाळकरांच्या मृत्यूने शिरोळ तालुक्यात व यड्राव गावात शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा