*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
रुकडी : रूकडी परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने कै.खासदार बाळासाहेब माने यांनी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालय ग्रामीण भागात असले तरी शहरी भागातील महाविद्यालयासारख्या शैक्षणिक व भौतिक सुविधा महाविद्यालय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे रॉयल असेसमेंट या संस्थेला सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाविद्यालयास नुकतेच आयएसओ 9001 : 2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील विविध घटकांना महाविद्यालयाचा लाभ व्हावा या हेतूने शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त बालवाडी शिक्षक प्रशिक्षण कोर्स तसेच टेलरिंग कोर्स सुरू केला आहे. शासन मान्य एमएस-सीआयटी व टायपिंग कोर्ससाठी सुसज्ज कॉम्प्युटर लॅब विकसित केली आहे या सेवा सुविधांचा लाभ रूकडी व परिसरातील विद्यार्थी व समाजातील गरजूंनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांतकुमार कांबळे यांनी केले ते महाविद्यालयास नुकतेच आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेसाठी दै.तरुण भारतचे प्रतिनिधी श्री. भगवानराव पोळसर, दै. महान कार्य रूकडी चे प्रतिनिधी श्री. सर्जेराव कांबळे,महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर चे जिल्हाध्यक्ष श्री. अनिल उपाध्ये, लोकमतचे प्रतिनिधी श्री.अभय व्हनवाडे दै.पुढारीचे प्रतिनिधी श्री. मानसिंग मुसळेसर, दै. पुण्यनगरीचे प्रतिनिधी श्री. रोहन देसाई, दै. सकाळचे प्रतिनिधी श्री.प्रशांत भोसले, दै. महान कार्य माणगावचे प्रतिनिधी श्री. सतीश पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डाॕ. प्रशांतकुमार कांबळे यांनी आयएसओ प्रमाणपत्र मिळणे कामी संस्थेच्या अध्यक्षा माजी खासदार डाॕ. निवेदिता माने, विद्यमान खासदार श्री. धैर्यशील माने, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.आभार डॉ. अशोक पाटील यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा