बहुजन क्रांती दलाची बैठक संपन्न |
* शशिकांत घाटगे : विशेष प्रतिनिधी*
हातकणंगले : प्रा.राम कांबळे सर संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुनगर माळभाग हातकणंगले येथे बैठक पार पडली.
मागासवर्गीय बहुजन समाजातील शाहुनगर हातकणंगले माळभाग येथे ३५ ते ४० वर्षापासुन राहत आहेत .हातकणंगले तालुका हा आता नगरपंचायत झाली आहे तरी त्या कुटुंबांना अजून त्यांना जागा कायमस्वरूपी करण्यात आली नाही.माणसाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र व निवारा आहेत पण पाणी व निवारा लाइट पासुन तेथील लोक वंचीत आहेत. तेथील पुरुष महिला हे गोर गरीब कष्टकरी मजुर मागासवर्गीय आहेत. राष्ट्रीय बहुजन क्रांती दल चे राज्य उपाध्यक्ष श्रीपती सावंत सर ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विलास लोंढे सर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सर्वगोडे सर, जिल्हा संघटक शशिकांत घाटगे सर ,ज्येष्ठ तज्ञमार्गदर्शक संभाजी केंचे सर यांच्या समोर बाजीराव बोराडे ,मिसाळ व तेथिल महिला पुरुषांनी आपल्या व्यथा मांडल्या व आम्हांला न्याय मिळावा म्हणून संघटनेला निवेदन दिले. श्रीपती सावंत सर व संभाजी केंचे सर लोंढे सर यांनी मार्गदर्शन केले.शशिकांत घाटगे सर यांनी संघटना तुमच्या कायम पाठिशी उभी राहील व तुम्हांस न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे वक्तव्य केले. आभार बाजीराव बोराडे सामाजिक कार्यकर्त्ता यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा