Breaking

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

*शिरोळ येथे कै.शंकर कृष्‍णा गावडे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान ; पारंपरिक रूढी परंपरेला फाटा*


प्रथम स्मृतिदिनी व्याख्यानाचे आयोजन


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


शिरोळ : यशोदीप बहुउद्देशीय सेवा संस्था अध्यक्ष श्री अमोल गावडे यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त इतर पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

     मंगळवार दि.01/03/2022 शिरोळ येथील छ.शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी 6 वाजता. प्रसिद्ध व्याख्यानकार, युथ स्पीकर ,समाजप्रबोधनकार लाइफ कोच ,प्रा.वसंत हंकारे यांचे विद्यार्थी ,पालक ,युवा पिढी व इतर सर्व घटकांना मार्गदर्शन करणार आहेत.

          यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.धैर्यशील माने ,शिरोळ नगरीचे नगराध्यक्ष मा.अमरसिंह माने पाटील ,आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, मा.पृथ्वीराज यादव ,मा.संजय  शिंदे, सर्व नगरसेवक व नगरसेविका शिरोळ नगरपरिषद यांची उपस्थिती प्रार्थनीय असणार आहे.

      तरी संबंधित सर्व घटकांनी जास्तीत जास्त व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा