Breaking

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

*जैनापुरात पोल्ट्री मध्ये एकाची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात*

 

जैनापुरात पोल्ट्री फार्ममध्ये एकाची आत्महत्या


*प्रा.मेहबूब मुजावर : जैनापूर प्रतिनिधी*


जैनापूर : शिरोळ तालुक्यातील जैनापूर या गावात एका पोल्ट्री फार्म मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. संजय दत्तू पवार (वय वर्ष ४८ रा. तुपारी ता. पलूस जि. सांगली) यांनी रविवारी दि.२० फेब्रुवारी ,२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान पोल्ट्रीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची वर्दी रवी पवार यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली.

    अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मयत संजय पवार हे विठ्ठल कांबळे यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म मध्ये राहण्यास होते. मात्र आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. याबाबतचा अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा