स्वामी समर्थ सेवेकरी मुली वृद्धाश्रमात सेवा करताना |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
अकिवाट : शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त साखर कारखाना समोरील श्रावण बाळ वृद्धाश्रम अकिवाट येथे शनिवार दि.१९ फेब्रुवारी,२०२२ रोजी स्वामी समर्थ मंदिर मधील श्री नृसिंहवाडी दत्त धाम केंद्रातील ५० मुलीनी वृद्धांची सेवा करून जीवनावश्यक अन्नधान्याचा पुरवठा केला.
अकिवाटच्या श्रावण बाळ वृद्धाश्रमाला दुपारी एक वाजता नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर मधील श्री नृसिंहवाडी दत्त धाम केंद्रातील ५० मुलीनी नृसिहवाडी मधील नागरिकांना आवाहन करीत नागरिकांच्या कडून धान्य,कपडे व जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आले. सदर संकलित साहित्य वृद्धाश्रमास देण्यात आले. त्याचबरोबर आश्रमातील सर्व ठिकाणची स्वच्छता करून वृद्ध नागरिकांना अंघोळ घालून त्यांचे पाय चेपून सहा तास सेवा करून निरोप घेण्यात आला.
यावेळी केंद्रातील सुशीला चव्हाण डॉ.सारिका नागणे, रंजना जगताप निशा चव्हाण, आरती नाईक, काजल साळुंखे,कोमल साळुंखे,पूजा खोसरे, गायत्री साळुंके, मीरा फाटक, सविता शिंदे या प्रमखासह सेवेकरी मुली हजर होत्या. यांचे स्वागत आश्रमच्या संचालिका शोभाताई पानदारे यांनी केले. याप्रसंगी विश्वास बालीघाटे व सुरेश सासणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ,शिवाजी कोळी,मल्लाप्पा कोरे, सिकंदर नदाफ अनेक नागरिक उपस्थित होते.
नृसिंहवाडीच्या स्वामी समर्थ मंदिरातील या सेवेकरी मुलीने केलेलं काम खऱ्या अर्थानं संवेदनशील व मानवतावादी आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा