मयत सोहेल मुल्ला,मिरज |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
मिरज : मिरजेतील सेंट्रींग काम करणार्या बांधकाम कामगाराचा काम करीत असताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर येत आहे.
सुरक्षेसाठी नसलेला साधनांचा अभाव त्यामुळे निष्पाप कामगारांचा बळी गेला आह. मिरजेतील गुरुवार पेठेतील जय भवानी मेटल मार्ट या दुकानाचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम तिसऱ्या मजल्या पर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी सेंट्रींगचे काम करणारा बांधकाम कामगार तरुण सोहेल दस्तगीर मुल्ला वय वर्ष २५ रा. पिरजादे प्लॉट शास्त्री चौक मिरज असे आहे.
मयत सोहेल मुल्ला शनिवारी काम करत असताना लिफ्टच्या बोगद्यातून सरळ खाली येऊन तळघराच्या जमिनीवर येऊन पडला गंभीरपणे जखमी झालेल्या सोहेलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी याबाबत लक्ष घालून इमारतीचे मालक, बिल्डर आणि इंजिनिअर व मिस्त्री यांच्यावर जोरदार टीका केली. बांधकामाचे काम करून घेताना बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा हा कोणता विचार केला जात नाही सुरक्षेसाठी साधन सामग्री बांधकाम व्यवसायिक व्यावसायिकांकडून पुरवली जात नाही त्यामुळे अशा बांधकाम व्यवसायिक, इंजिनियर बिल्डर आणि जागा मालक आणि बांधकाम करून घेणाऱ्या मिस्त्री वर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्याकडे केली आहे तर या घटनेची माहिती देऊन निष्पाप बळी गेलेल्या सोहेल मुल्ला यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत आणि थोडीशी भरपाई म्हणून दोन ते पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
मयत सोहेल मुल्ला कुटुंबात एकटा कमवता असल्याने आईवडील वयस्कर आहेत ,दीड वर्षाचे बाळ असून त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. सोहेल मुल्ला यांच्या पाठीमागे एक लहान भाऊ आहे त्यामुळे डॉ. महेश कुमार कांबळे यांनी या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे.
या घटनेने बांधकाम कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा