विजेच्या तारा तडकून अपघात |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
विटा : उसाने भरलेल्या ट्रकचा वरील भाग विद्युत तारा मध्ये अडकला यावेळी मुख्य रस्त्यावर मोठा स्पार्क होऊन सर्व विद्युत तारा पडल्या. अपघातात विजेच्या तारांमध्ये ट्रक अडकून पडला.मोठा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अपघातानंतर तातडीने शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर ट्रक लेंगरे रस्त्यावरून छ. शिवाजी महाराज चौकाकडे येत होता त्यावेळी भैरवनाथ थिएटर जवळ आल्यानंतर उसाने भरलेल्या ट्रकचा वरील भाग विद्युत तारा मध्ये अडकला व तारा अडकलेल्या स्थितीत हा ट्रक तसाच पुढे आल्याने विजेच्या तारा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कोसळल्या, यावेळी शेजारील खांब देखील वाकडा होऊन ट्रक मध्ये अडकला व जोरात स्पार्क होऊन मोठा जाळ झाला. यानंतर तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या तारा बाजूला केल्या असून खांबात अडकलेला ट्रक ही बाहेर काढण्यात नागरिकांना यश मिळाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा