Breaking

मंगळवार, १ मार्च, २०२२

*युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू *

 

रशिया -युक्रेन युद्ध


           भारताच्या परराष्ट्र  मंत्रालयाच्या दाव्यानुसार एक भारतीय विद्यार्थी मृत्युमुखी पडला आहे. यामुळे खळबळ माजली असून अजुन बरेच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने विशेष विमाने सोडली आहेत. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. रशियन सैनिक सुद्धा मारले गेले आहेत.   भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आजची ही बातमी खळबळ माजवणारी आहे. गोळीबारात ठार झालेला विद्यार्थी हा मूळचा कर्नाटकचा असून तो एम.बी.बी.एस च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. 

मृत्यू  झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शेखरप्पा ग्यानगौडा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा