Breaking

रविवार, २० मार्च, २०२२

*वित्तीय व्यवस्थेतील बदल अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक : डॉ. पी.एस.कांबळे*

 

कन्या कॉलेजमध्ये मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.पी.एस.कांबळे

*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


इचलकरंजी : भारताच्या चलन व्यवस्था आणि वित्तिय व्यवस्थेमध्ये बदल होत असल्याने सध्या अर्थव्यवस्थेला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. व भविष्यात हे बदल अत्यंत घटक ठरू शकतील असे मत डॉ.पी.एस.कांबळे - माजी विभागप्रमुख अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी व्यक्त केले. येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे अर्थशास्त्र विभागाच्यावतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महिला विकासातील योगदान या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी बाबासाहेबांचे जलव्यवस्थापन , वित्तीय व्यवस्थापन,ऊर्जाव्यवस्थापन, शैक्षणिक व्यवस्था इत्यादी मधील योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या  सत्रात डॉ. अमर कांबळे यांनी डॉ.बाबासाहेबांचे महिला विकासातील योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना  वारसा हक्क , समानता , अभिव्यक्त स्वतंत्र इत्यादी महिलांविषयक हक्क आणि अधिकाराची माहिती दिली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. 

     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. त्रिशला कदम यांनी केले. प्रा. प्रभुदास खांबडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. संपदा टिपकुर्ले व निकिता तावदारे यांनी केले. यावेळी प्रा. स्वप्नील वाकडे , डॉ.सुभाष जाधव प्रा.संदीप पाटील, प्रा.कुंभार , प्रा. पोवार , प्रा.कानडे इतर महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक विद्यार्थिनी व विद्यार्थिनी मोट्या संख्येने उपस्थित होत्या. आभार अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉ. संतोष बोराटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा