शॉक लागून मृत्यू झालेला विशाल पाटील |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
शिरोळ तालुक्यातील दानोळी मधील नांद्रे मळ्यातील विशाल चवगोंडा पाटील या वीस वर्षीय युवकाला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. विशाल सकाळी साडेआठ वाजता शेतातील बोरची मोटर सुरू करण्यासाठी गेला होता विज पेटीच्या हँडलला हात लावताच तो तेथेच चिकटला. ही बाब लक्षात येताच शेजारच्या शेतकर्याने काठीने बाजूला करायचा प्रयत्न केला. सदर युवकास औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. विद्युत निरिक्षक जयश्री पाटील यांनी पाहणी केली असता सर्विस वायर मधून पॅटीज करंट उतरल्याचे लक्षात आले. विशाल पाटील या युवकाचा मृत्यू झाला महावितरणाचा अनागोंदी कारभाराचा पाढा विद्युत निरीक्षका समोर वाचण्यात आला. त्या घटनेने गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होते.
दानोळी चे पोलीस पाटील सागर मगदूम आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहिल्याने पुढील अनर्थ टळला. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा