मारहाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल ;आंदोलनाला यश |
*प्रा.इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
विटा : मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलनाला मोठे यश मिळाले. वाळू तस्करांवर "पत्रकार संरक्षण कायदा" अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर जनसामान्यांच्या रेट्यासमोर जिल्हा प्रशासनाने सपशेल माघार घेतली.
यासंदर्भातील अधिकृत माहिती अशी की, कडेगाव येथील एका पत्रकाराने वाळू तस्करीच्या दिलेल्या माहितीवर कारवाई न करता पत्रकाराचे नाव वाळू तस्करांना कळवून त्यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या कडेगाव येथील प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व मारेकर्यांवरही कारवाई व्हावी यासाठी पत्रकारांनी विटा येथील डीवायएसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते.
यामध्ये खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील पत्रकार सहभागी झाले होते. बघता बघता या आंदोलनामध्ये पत्रकारांसह सर्वसामान्य माणूस ही जोडला गेला जाऊनआंदोलनाला सार्वत्रिक रूप प्राप्त झाले होते. लोकांमध्ये सदर घटनेबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली होती, पत्रकारांना साथ देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील बरेच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अखेर मंत्री विश्वजीत कदम यांनी या प्रकरणात लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, त्यानुसार वाळू तस्करी करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांसह महसूल विभागातील अनेकांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जनसामान्यांच्या रेट्यासमोर अखेर प्रशासनाने सपशेल माघार घेतली तसेच पत्रकारांच्या मागण्या मान्य झाल्या असून याप्रकरणी वडेरायबाग येथील हणमंत वाघमोडे, जयपाल वाघमोडे व धैर्यशील बाबर (सध्या राहणार विटा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पत्रकारांच्या या मागण्या मान्य झाल्यानंतर सर्वसामान्यांसह पत्रकारांनी जोरदार जल्लोष केला. शिवराज काटकर यांनी राजकीय नेत्यांसह नागरिकांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा