चिंचवाडच्या दोन चोरट्यांना केले अटक |
शिरोळ : दोन देशी शेळ्या चोरीच्या आरोपाखाली शिरोळ पोलिसांनी चिंचवाड येथील दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शिरोळ पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,शिरोळ पोलीस ठाणे गु.र.नं 313/2021 प्रमाणे IPC कलम 379 प्रमाणे दि. 30/12/2021 रोजी गुन्हा दाखल झालेले होता.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळवून यातील संशयित 1) विजय रावसो नाईक व. व 29 राहणार - चिंचवाड ता. शिरोळ. 2) प्रसाद सुरेश देसाई व. व 19 रा. चिंचवाड ता. शिरोळ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 2 देशी जातीच्या शेळी मिरज बाजार येथे 12,000/- रूपयेस विक्री केले बाबत कबुली दिली, सदरची रोख रक्कम व गून्हा करणेस वापरलेली यामाहा कंपनीची RX-100 किंमत 50000/- असा एकूण 62,000/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई गुन्हे शोध पथकातील पो. हे.कॉ. प्रदीप कुंभार, पोलीस नाईक ताहीर मुल्ला, अभिजीत परब,पो.कॉ रहिमान शेख, संजय राठोड या पथकाने केली आहे.
सदरच्या या यशस्वी कारवाईबाबत शिरोळ पोलिसांचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा