घोडावत कन्या महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न |
गीता माने : सहसंपादक
जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, Antiragging हेल्पलाईन कमिटी, सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या "माझी वसुंधरा" अभियाना अंतर्गत ८ मार्च २०२२ रोजी "जागतिक महिला दिना निमित्त एक मुलगी असणाऱ्या दांपत्यांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ. गीता दोडमनी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रियांचे प्राचीन काळापासून आधुनिक काळातील बदलते जीवन या विषयी मार्गदर्शन केले.
कन्या महाविद्यालय, जयसिंगपूरच्या युव्हीजी हॉल मध्ये महाविद्यालयीन प्रा.डॉ. सौ माधुरी शिंदे, कु. नयना नवले, सौ. शिल्पा सूर्यवंशी, सौ विद्याश्री बिल्लूर, सौ तृप्ती शहा, कु. रोहिणी पाटील व सौ. पद्मश्री पाटील, कु. प्रियंका खतग्यार व श्रीमती शोभा मुधोळे या प्रशासकीय सेवक महिलांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना डॉ. दोडमनी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान, तसेच महिला सक्षमिकरण, महिलांचे जीवन, महिलांचे सामाजिक स्थान, कुटुंबाची जबाबदारी व महिलांचे भविष्य याविषयी चर्चा करत महिलांना प्रेरणा देत महिलांच्या विविध समस्यांची चर्चा केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी मा. प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक हे होते. त्यांनी महिला दिनाविषयी शुभेच्छा देत त्यांचे हक्क व कर्तव्य या बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक डॉ. सौ. माधुरी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी प्र. प्राचार्य डॉ. ए. एस. भिलवडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. गौतम ढाले, कनिष्ठ विभाग प्रमुख श्री. सलीम मुजावर, डॉ. पंडित वाघमारे व सर्व प्राध्यापक तसेच प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार डॉ. संदीप रावळ सूत्र संचालन ग्रंथपाल सौ. तृप्ती शाह व कु. नयना नवले यांनी केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा