अँड.रामचंद्र खांडेकर |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
रुकडी : कायद्याने पुरुषाप्रमाणे स्त्रियांनासुद्धा आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क दिला आहे. परंतु बहुतेक वेळा स्त्रियांना आई वडिलांच्या संपत्ती मधील हिस्सा दिला जात नाही. एकूण लोकसंख्येत स्त्री-पुरुषांचे प्रमाण साधारणपणे समान आहे. लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात देशाचा राज्यकारभार चालविताना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेत स्त्रीयांना पन्नास टक्के आरक्षण देऊन चालणार नाही तर विधानसभा आणि लोकसभेत सुद्धा स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. स्त्री कोणत्याही क्षेत्रात काम करीत असेल तेथे आपले कर्तुत्व सिद्ध करीत असते, समाजाच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान संधी देणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील प्रसिद्ध वकील अॕड. रामचंद्र खांडेकर यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, सचेतना मंडळ आणि जेंडर चॅम्पियन क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त एक कन्या अपत्य दाम्पत्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे यांनी केले. सुरुवातीस एक कन्या अपत्य असणाऱ्या अॕड. रामचंद्र खांडेकर आणि डाॕ.माधवी खांडेकर या दांमपत्याचा सत्कार करण्यात आला तसेच महाविद्यालयातील शिक्षिका डाॕ. लता मोरे, डाॕ. शर्मिला साबळे, अस्मिता घोरपडे, अश्विनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डाॕ. माधवी सोळांकुरकर म्हणाल्या आम्हा दोघा पती-पत्नीची इच्छा होती की आम्हांस पहिले अपत्य हे कन्या व्हावे त्याप्रमाणे कन्या जन्मास आली तेव्हा पतीने आनंदाने पेढे वाटले. एक कन्या अपत्यामुळे आमचे कुटूंब आनंदी आहे.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॕ. प्रशांतकुमार कांबळे म्हणाले कुटुंबातील सर्व जबाबदारी स्त्री सक्षमपणे सांभाळत असते.प्रत्येक कुटुंबात स्त्रीयांना सन्मान दिला पाहिजे. आभार डाॕ.लता मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा