किडनी दिनानिमित्त सायकल रॅली स्पर्धा |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : कोल्हापूरचे नेफ्रोलॉजी ग्रुप व डेक्कन नेफ्रॉलोजी सोसायटी अंतर्गत, असोसिएशन ऑफ फिजिशियन इंडिया, कोल्हापूर युरोलॉजिकल सोसायटी, कोल्हापूर मेडिकल असोसएशन, डिपार्टमेंट ऑफ मेडीसिन, डी वाय पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक किडनी दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दसरा चौक येथून सकाळी साडे सहा वाजता सायकल रॅलीची सुरुवात झाली. कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व डॉ. आशा जाधव, प्रेसिडेंट कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात झाली. हा मार्ग दसरा चौक- व्हीनस कॉर्नर - दाभोळकर कॉर्नर - ताराराणी चौक - धैर्य प्रसाद हॉल - पोलिस मैदान - एस पी चौक - दिगंबर जैन बोर्डिंग हॉल असा होता. सायकल चालवा आपल्या किडनीचे आरोग्य टिकवा हा संदेश या रॅली द्वारे देण्यात आला. मूत्रपिंडाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा ह्या रॅली चा उद्देश होता. डेक्कन नेफ्रोलॉजी सोसायटीचे , सेक्रेटरी डॉ.अभिजित कोराणे, सायंटिफिक चेअरमन डॉ. विलास नाईक,खजिनदार डॉ. प्रकाश शारबिद्रे,डॉ. प्रवीण घुले, डॉ. रोहित पाटील,डॉ सुनील पाटील,डॉ युवराज सावंत,डॉ. डी एम कोळी यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रननिति क्लबची टीम व त्याचे संस्थापक विशाल गुडूळकर यांनी आयोजन व नियोजन केले.कोल्हापूर बुलेट रायडर्स नी रॅली ला साथ दिली. वैभव बेळगावकर व राजीव लिंग्रस यांनी साथ दीली.कोल्हापुरातील साधारणपणे 200 सायकलस्वार ह्या रॅली मध्ये सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा