.
समाज मंदिर,नांदणी |
*शशिकांत घाटगे : विशेष प्रतिनिधी*
नांदणी : महाराष्ट्र शासनाने ग्राम पंचायत कामगारांना ऑगस्ट २०२० मध्ये सुधारित किमान वेतन लागू केले आहे.सदर शासन निर्णयाची अमलबजावणी करणेबाबत सर्व कर्मचारी ग्रामपंचायती कडे गेली २ वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.दिनांक २ /२/२०२२ रोजी सर्व कर्मचारी व श्रमिक विकास संघ जनरल कामगार युनियन यांच्या वतीने ग्रामपंचायत नांदणी यांना या बाबतीत लेखी निवेदन दिले होते ,मात्र याबाबत अद्याप ग्रामपंचायती मार्फत अजून कोणतीही कार्यवाही झाली नाही
सदर बाबीचा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निषेध व्यक्त करून , कर्मचारी यांच्या मागण्या साठी सोमवार दिनांक २१/३/२०२२ पासून काम बंद आंदोलन करण्याचा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निर्णय घेतला आहे व लवकरात लवकर किमान वेतन लागु व्हावे अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत कामगार श्रमिक जनरल कामगार संघटनेचे कॉम्रेड आप्पा पाटिल ,सुधाकर बल्लारी,औदंबर साठे,सुकुमार कांबळे,संदिप बिरंजे,बाबासो मोहिते यांनी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा