Breaking

बुधवार, १६ मार्च, २०२२

महिला दिनानिमित्त श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली महाविद्यालयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिणींचा सत्कार करत आगळ्यावेगळ्या पध्दतीने महिला दिनाचा कार्यक्रम साजरा..



       जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगली शिक्षण संस्थेचे, श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली महाविद्यालय येथे विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून एक आगळावेगळा महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या सर्व कर्तृत्ववान महिलाच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांचा सत्कार करून त्यांच्या यशोगाथा बी.एड्. विद्यार्थ्यांपुढे मांडण्यात आल्या. 


दिपप्रज्वलन 


      या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या तसेच सत्कारमूर्ती म्हणून  उपस्थित असलेल्या  महिलांमध्ये श्रीमती अश्विनी महावीर मंडपे (जेलर), श्रीमती वंदना कांबळे - पोलीस नाईक (मोटार वाहन विभाग), श्रीमती प्रज्ञा म्हेत्रे - पत्रकार, श्रीमती. वंदना हुळबत्ते - शिक्षिका, श्रीमती सरला पवार - पोस्टमन, श्रीमती अनिता लोंढे - एस.टी. वाहक, श्रीमती जयश्री सरगर कर्मचारी पेट्रोल पंप, श्रीमती मंगला कोळेकर - अंगणवाडी सेविका,  श्रीमती भाग्यश्री कुलकर्णी शिक्षिका, पेटी वादक व नाटककार आदी महिलांचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.


प्रमुख पाहुणे आणि बी.एड चे शिक्षक व विद्यार्थिनी


     आपल्या मनोगत व मार्गदर्शनामध्ये जेलर असलेल्या श्रीमती अश्विनी मंडपे यांनी आज मानवाच्या गरजा अन्न, वस्त्र व निवारा या गरजाबरोबरच स्वतःचे संरक्षण ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व स्त्रियांनी सक्षम बनण्याचे आवाहन त्यांनी केले.

     निर्भया पथकाच्या श्रीमती वंदना कांबळे यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेली कलमे व उपकलमे सांगितली.व त्यानुसार स्त्रीयांना मिळणारे संरक्षण याविषयी माहिती दिली. निर्भया पथक स्त्रीयांसाठी करत असलेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली.

    शिक्षिका व लेखिका श्रीमती वंदना जी म्हणाल्या की स्त्रीवर अन्याय होण्याला स्त्रीने बेजबाबदार राहू नये, आपल्या मुलांवर डोळसपणे चांगले संस्कार करावेत त्याला आदर्श नागरिक बनवावे, जेणेकरून स्त्रियांशी निगडित गुन्हे घडणारच नाहीत. मुलांना घडवणे स्त्रीयांच्याच हातात आहे.

     प्रत्येकाने एक तरी कला जोपासली पाहिजे ती कला आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते असे मत श्रीमती भाग्यश्री कुलकणी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या इतर सत्कारमूर्तीनिही मनोगत व्यक्त करताना मुलींनी आपले ध्येय ठरवावे व ते ध्येय गाठण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करावेत, तसेच कोणतेही काम करताना लाजू नये असे सांगितले.

       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ बी. पी. मरजे यांनी अध्यक्षीय भाषण केले .  महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी कौतुक केले व सर्व विद्यार्थिनींनी त्यांचा आदर्श घेवून उल्लेखनीय कामगिरी करण्याचा सल्ला दिला त्याबरोबरच विद्याथ्र्यांना स्त्री-पुरुष समानतेचे समाजातील महत्त्व सांगीतले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. संध्या यादव यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख जेष्ठ प्राध्यापक डॉ. सुशिल कुमार व किर्ती कुलाचे विद्यार्थी व मार्गदर्शक डॉ. इंदलकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. वाय.वाय.प्रवार,  श्री. डी.बी. बोंदर, सौ. जी. एस. जाधव, श्री. एस. एस. पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी. एड्. विद्यार्थीनी कु. स्नेहा कुरने व कु. सोनाली सावंत यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा