दरीत कोसळलेली कार |
वृत्तसंस्था : कोल्हापूर - रत्नागिरी राज्यमार्गावर एक मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आंबा घाटातून जाणारी कार थेट दरीत कोसळली आहे. प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कारमध्ये अंदाजे सहा प्रवासी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले आहेत. हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही विश्वसनीय माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा