Breaking

गुरुवार, १० मार्च, २०२२

*आंबा घाटातील अपघातात महिलेसह बालकाचा जागेवरच मृत्यू; अन्यजण गंभीर जखमी*

  

अपघात झालेल्या कारची अवस्था


*हेमंत कांबळे  : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


कोल्हापूर  : आंबा घाटात तीनशे फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात महिलेसह बालक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

    अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणावरील विसावा पॉइंट येथे कार चालकाचा ताबा सुटल्याने कार तीनशे फुट दरीत कोसळली आहे. झालेल्या अपघातात डॉ.सृष्टी संतोष हरकुडे वय ३२ व तिचा मुलगा निवांत संतोष हरूकुडे वय -३ महिने दोघेही या सांगली हे दोघे माय-लेक ठार झाले आहेत. अन्यजण जखमी  झाल्याची नोंद देवरूख पोलिसांत झाली आहे. हा अपघात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

      डॉ हरकुडे व डॉ.फुलारे दोन्ही गाडीतून गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघाले असताना आंबा घाटातील चक्री वळणावरील विसावा पाईटवरू कार क्र.के ए-२२ झेड०९४९ ही गाडी दरीत तीनशे फुट खाली कोसळून झालेल्या अपघातात डॉ सृष्टी हरकुडे व तिचा मुलगा हे दोघेजण ठार झाले. गाडीतील डॉ. संतोष हरकुडे ३५, मुलगी मन्मिता ३ वर्षे,, डॉ. प्रताप तंबाखे ७०, रेहान प्रणव सुभेदार साडे चार वर्षे, पत्नी डॉ. दीप्ती फुलारे ३२, मुलगी आज्ञा फुलांरे   वय ६ वर्षं सर्वजण राहणार विश्रामबाग सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत.

    मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले.तर जखमींना कोल्हापूरातील खासगी हॉस्पिटल अस्टर आधाराला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघातस्थळी आंब्यातील स्थानिक तरूण  प्रमोद माळी, दिग्विजय गुरव,सुनील काळे , स्वप्निल गायकवाड,साहिल नागरगोजे,कृष्णा पाटील,युवराज कांबळे, अविनाश कांबळे, देवरूखचे पोनि बाळकृष्ण पाटील,रेस्क्यू टिमचे ए.आर.काकडे आदिनी मृत व जखमींना दरीतून वर काढण्यासाठी परिश्रम घेतले.

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा