ओंकार पाटील यांचा सत्कार करतांना |
*प्रा अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथील एन. सी. सी. व्दितीय वर्षात प्रशिक्षण घेत असलेला एन. सी. सी. कॅडेट ओंकार नारायण रावण यांची इंटर युनिव्हर्सिटी निवड चाचणीत चंदिगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया कयाकिंग स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.
यासाठी त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले, एन.सी.सी प्रमुख कॅप्टन डॉ.संतोष जेठिथोर, शारीरिक शिक्षण प्रमुख प्रा.श्रीनिवास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण चौगले यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयातील एन. सी. सी. चे सर्व कॅडेट उपस्थित होते.
या निवडीने ओंकारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा