Breaking

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

*शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे एका इसमाने गळफास लावून केली आत्महत्या*

 

टाकवडे येथील संभाजी महादेव देसाई यांनी केली आत्महत्या

जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी


जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील एका इसमाने  गळफास लावून घेऊन आत्महत्या केली असल्याचे माहिती समोर आली आहे.

      टाकवडे येथील मयत संभाजी महादेव देसाई वय वर्षे ५२ यांनी ३० मार्च २०२२ रोजी दु.१.३० ते रात्री ११.३० च्या दरम्यान टाकवडे येथील धनंजय रामा गुरव यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या पत्र्याचे शेड वजा गोठ्या मधील लोखंडी अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

      अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मयत संभाजी महादेव देसाई वय वर्ष ५२ हे दुपारी १.३० सुमारास घरी येऊन जेवण खान करून परत कामावर निघून गेले ते परत न आल्याबाबत ची वर्दीदार यांचा भाऊ सुहास याने वर्दीदार शीतलकुमार संजय पाटील वय वर्ष ३२ रा. टाकवडे यांना फोन करून कळल्याने व वर्दीदार व सुहास देसाई तसेच त्यांच्या गावातील लोकांनी यातील मयत यांचा शोध घेतला असता ते ३० मार्च २०२२ रोजी दु.१.३० ते रात्री ११.३० च्या दरम्यान टाकवडे येथील शेतात गळफास लावून घेऊन मयत झाले असल्याबाबतची वर्दी दार यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन मयत झाल्या बाबतची बाजूस प्रमाणे मयत दाखल करून मयताचे प्राथमिक तपास करण्याकरिता मदतीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ८०५ सानप व पोलीस नाईक २१०० मुजावर त्यांना रवाना केलेली नोंद आहे. सदरचा गुन्हा ३१ मार्च २०२२ दु.२.१० दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास अंमलदार मपोसई काळे मॅडम आहेत.

      या घटनेने सदर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा