Breaking

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

*सुपरहिट सिनेमा आर आर आर आणि कोल्हापूरचे व्हीएफएक्स कनेक्शन*


कोल्हापूरचे कलाकार तरुण

*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर  : सुपरहिट RRR सिनेमा आत्ताच प्रदर्शित झाला आणि त्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हा बिग बजेट सिनेमा असून सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खास आकर्षण बनले. या सिनेमाचे दिग्दर्शन बाहुबली फेम एस एस राजमाऊली यांनी केले आहे. 

     सिनेमात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमातील 'नाचो नाचो' आणि 'जननी' गाणे सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

       कौतुकाची बाब म्हणजे, या सिनेमासाठी आपल्या कोल्हापूर मधील रुईकर कॉलनी स्थित नामांकित संस्था ' किफ्रेम स्टुडिओ चे' शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून व्ही एफ एक्स चे काम पाहिले. यामधील अनेक चित्तथरारक प्रसंग कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या मदतीने वास्तवतेच्या पलीकडे असे रोमांचकारी इफेक्ट यामध्ये देण्यात आले आहेत.

    बाहुबली, 83 , सिम्बा, रंगबाझ, ब्रिद, प्रोजेक्ट 9191, गुरू,प्यार वाली लव्ह स्टोरी या व यासारख्या अनेक चित्रपटातील साहसी दृश्यांचे एडिटिंग या टीमने केले आहे. भारतीय चित्रटसृष्टीच्या वाटचालीत कोल्हापूरचा मोलाचा वाटा आहे; त्यामुळे अनेक नावाजलेले हिंदी, मराठी व हॉलिवूड सिनेमे यांचं एक कोल्हापूरशी अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. या तंत्रज्ञान च्या युगात चित्रपट व्यवसाय देखील पूर्णपणे बदलला आहे. यातूनच अनेक थ्री-डी आणि स्पेशल इफेक्ट्स चा भरभरून वापर आजकालच्या चित्रपटांमध्ये होत आहे. केवळ मराठी चित्रपट सृष्टी पुरत मर्यादित न राहता हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉलीवुड चित्रपटांच्या निर्मितीत कोल्हापूरचा वाटा मोलाचा ठरत आहे. कीफ्रेम स्टुडिओ मधील तरुणांकडून बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे व्हीएफएक्स एडिटिंग केले जाते.  

     ॲक्शन चित्रपटांमधून रोमांचक वातावरण निर्माण करून साहसी दृश्ये आणि फायटिंग दृश्य दाखवण्यासाठी थ्री- डी व्हीएफएक्स आणि रोटो एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. यासाठी सध्या कोल्हापूरच्या या तरुणांकडून चालवल्या जाणाऱ्या 'किफ्रेम' स्टुडिओचे चे कौशल्य व कौतुक आहे. या स्टुडिओतून गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधील नावाजलेल्या चित्रपटांचे रोटो एडिटिंग व कम्पोजिटिंग झाले आहे. अनेक मलिंकांचे व चित्रपटांचे बरेचशे एडिट करण्याचे कामही त्यांनी केले आहेत. विशेष म्हणजे स्टुडिओला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त आहे.

       यासाठी या संस्थेतील संस्थापक व शिक्षक, श्री. मधुर चांदणे व श्री. वसीम मुल्लानी यांच्याबरोबर मार्गदर्शक श्री. विशाल गुडूळकर यांनी काम पाहिले.


......काय आहे व्हीएफएक्स एडिटिंग ? ॲक्शन चित्रपटात आपण ज्यावेळी एखाद्या नायकाला अनेक गुंडा बरोबर फायटिंग करताना पाहतो, त्यातील काही क्षण प्रत्यक्षात वा काही क्षण मात्र स्टुडिओमध्ये चित्रित केले जातात. व्हीएएक्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या चित्रीकरणाला स्पेशल इफेक्ट देऊन ते अधिक उत्सूर्फ व मनोरंजक बनवले जातात. जसे की आपण साऊथ इंडीयन किंवा रोहित शेट्टी यांच्या चित्रपटामधून फाईट चे सीन अथवा गाड्याचे स्टंट भरपूर प्रमाणात असतात पण हे सर्व स्टुडिओ मध्ये चित्रित करतात आणि मग ही सगळी कौशलता व्ही एफ एक्स नी साध्य करता येते. जेणेकरून त्यामध्ये वास्तवता दिसावी व प्रेक्षक ती दृश्ये पाहून अचंबित व्हावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा