Breaking

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

*शिवाजी विद्यापीठाचा ५८ वा वार्षिक दीक्षांत समारंभ ५ मार्च रोजी आभासी पद्धतीने ; पदवी संपादणूकी मध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची बाजी*

 

शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वार्षिक दीक्षांत समारंभ

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ ५ मार्च,२०२२ रोजी आभासी(online) पद्धतीने यू ट्यूबवर अर्थात विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' (https://www.youtube.com/c/ Shiv Varta) या अधिकृत यू ट्यूब वाहिनीवरच सकाळी १०.४५ वाजता ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे.तरी सर्वांनी आभासी पद्धतीने  कार्यक्रमात सहभागी राहणे बाबतचे आवाहन कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

प्रमुख अतिथी,डॉ. दिनकर साळुंखे

       सदर दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थानी मा.भगत सिंह कोश्यारी, महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मा.कुलपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनकर साळुंखे,( डायरेक्टर इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्ली) व अतिथी म्हणून मा. नामदार उदय सामंत मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य हे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.राजर्षी शाहू सभागृहात सकाळी १०.४५ वाजता दीक्षांत समारंभास सुरुवात होईल.


     💐 या दीक्षांत सोहळ्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे  💐


१) विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयाद्वारे महाविद्यालयीन स्तरावर होणारा पदवी वितरण कार्यक्रम होणार नाही.

२) प्रत्यक्षपणे कोणतेही पारितोषिक अथवा पदवी प्रदान केली जाणार नाही. त्यासंदर्भात स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. 

२) निमंत्रितांनीही कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित न राहता ' ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत.

३) सर्व पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके पोस्टाद्वारे पाठवली जाणार आहेत. 

४) या दीक्षांत समारंभासाठी सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क पेमेंट गेटवे द्वारे तर दीक्षांत फक्त ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारण्यात आले आहे. पेपरलेस प्रणालीचा वापर

५) सर्व पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके प्राप्त स्थानकांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर 58 convocation टॅब अंतर्गत प्रदर्शित केली जाईल.

६) सर्व पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके स्नातकांना रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहेत.

७) पदवी संपादणूकी मध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण सर्वात अधिक आहे.

८) परदेशी १९ विद्यार्थी त्यापैकी २ विद्यार्थी पीएच.डी. पदवीधारक असणार आहेत.

९) अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : दीक्षांत विभाग ०२३१-२६०९११३/२६०९३०२


    प्रा.डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, यावर्षी एकूण ६२,३६० पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत त्यापैकी "यदा ३२ हजार ५२० विद्यार्थिनी,(५२℅) तर २९ हजार ८४०(४८%) विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

   सुवर्णपदक वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील ऐश्वर्या आकाराम मोरे, तर कुलपती सुवर्णपदक दानोळी (ता. शिरोळ) येथील स्वाती गुंडू पाटील हिला जाहीर झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. उपस्थितीत सोहळा होणार आहे.

     सदर पत्रकार परिषदेत प्र कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक मा. गजानन पळसे उपस्थित होते.

1 टिप्पणी: