Breaking

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शिवाजी विद्यापीठात दि. २ मे ते ४ मे रोजी लोकराजा स्टार्टअप व इनोवेशन फेस्टीवल : संचालक, डॉ. एम. एस. देशमुख*



*प्रा. अक्षय माने :  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर  : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त कृतज्ञता पर्व साजरे करणेत येत आहे. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लोकराजा स्टार्टअप व इनोवेशन फेस्टीवल दि. २ मे २०२२ ते ४ मे २०२२ या कालावधीत साजरा करणेत येत आहे.

    नवसंशोधन आणि उद्योजका मध्ये जनजागृती निर्माण करणे, विद्यार्थी संशोधक व नागरीक यांना नवसंशोधनातून प्रोत्साहित करणे तसेच तळागाळातील समस्यांचे निराकरणे करणाऱ्या संशोधनास प्रोत्साहित करणे शैक्षणिक संस्थांना संशोधन परिसंस्था निर्माण करणेसाठी संधी देवून प्रोत्साहित करणे इत्यादी उद्देश नजरेसमोर ठेवून सदरचा  फेस्टीवल साजरा करणेत येणार आहे.विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने संशोधनात्मक तज्ञाच्या व्याख्यानांची शृंखला दि. ११/०४/२०२२ ते दि. २२/०४/२०२२ या कालावधीत आयोजीत करणेत आली आहे. नवसंशोधन प्रदर्शन शाहू मिल कोल्हापूर येथे दि. २/५/२०२२ ते ४/५/२०२२ या कालावधीत आयोजीत करणेत आले आहे. यातील उत्कृष्ट नवसंशोधक प्रकल्पांना आकर्षक, प्रोत्साहनात्मक बक्षीस व प्रशस्तीपत्र देवून गौरविणेत येणार आहे.

    स्टार्टअप तसेच नवसंशोधक यांच्या उद्योगातील पुढील वाटचालीसाठी गुंतवणूकदार व नवउद्योजक यांच्यामध्ये दि. ३/५/२०२२ रोजी संवाद साधणेचा उपक्रम आयोजीत करणेत आला आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील विविध समस्यांचे निराकरण करणेसाठी, नवसंशोधकांना प्रोत्साहित करणेसाठी आणि नवउद्योजकांना उभारी देणेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तरी या फेस्टीवल मध्ये कोल्हापूर जिल्हा परिसरातील तमाम नवसंशोधकांनी व इच्छुकांनी सहभाग घ्यावा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे व सदर कार्यक्रमास भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासन व नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राचे प्रभारी संचालक, डॉ. एम. एस. देशमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेमार्फत करणेत येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा