Breaking

रविवार, २४ एप्रिल, २०२२

*शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे १ मे रोजी आंबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा ; सहभागी होण्याचे केले आवाहन*

 

गणेशवाडी येथे आंबी समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

*विक्रांत माळी  : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : गणेशवाडी येथे १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील आंबी समाजाचा वधू-वरांचा परिचय मेळावा संपन्न होणार आहे.

      दि.२४/४/२०२२ रोजी मु.पो. गणेशवाडी ता. शिरोळ येथे महाराष्ट्र-कर्नाटकातील आंबी समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.सदर मिटींगमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यानुसार रविवार दि. १/५/२०२२ रोजी, लक्ष्मी मंदिर गणेशवाडी येथे आंबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा घेणेचे निश्चित करण्यात आले आहे.सदर मेळावा सकाळी ठिक ८.३० वाजता सुरु होईल.मेळाव्याला येताना वधुवरांचे रंगीत फोटो व बायोडाटा    (इंग्रजी-मराठी व इंग्रजी-कन्नड) घेऊन येणेचे आहे.सदर मेळाव्याला  महाराष्ट्र व कर्नाटकातील  आंबी समाजाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव व सर्व संचालक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्या बाबतची माहिती गणेशवाडीचे आंबी समाजाचे संचालक श्री.सदाशिव आंबी यांनी दिली आहे. तरी समाजातील घटकांनी वधु वर परिचय मेळावास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा