![]() |
स्पोर्टस बाईकच्या धडकेत बालकाचा मृत्यू |
इचलकरंजी : येथील जवाहर नगर परिसरात स्पोर्टस बाईकच्या धडकेत एक गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आदित्य आदिनाथ जाधव असे मयत बालकाचे नाव आहे. अपघाताची घटना गुरुवारी सायंकाळी जवाहर नगर परिसरात घडली होती याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
या अपघातात मोटरसायकलस्वार किरकोळ जखमी झाला आहे. इचलकरंजी शहरातील जवाहर नगर ज्योतिबा मंदिर परिसरात जाधव कुटुंबिय राहत आहे असून त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य गुरुवारी सायंकाळी घरासमोर खेळत होता. त्याचवेळी निघालेल्या स्पोर्ट्स बाईक च्या जोराची धडक बसली. यामध्ये आदित्य गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली. अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यात करण्यात आले आहे.
सदर परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा