Breaking

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

चला पाणी संपत्ती वाढवूया ! चिरंतन विकास साधूया : मा. खंडेराव पार्वतीशंकर हेरवाडे

 


            (H2O) म्हणजे जीवन त्याचा जपून वापर करा. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सृष्टीतील एक ही जीव जगू शकत नाही. पाण्याशिवाय शेती नाही की उद्योगधंदे नाहीत. पाणी नाही तर अस्तित्व नाही असेच म्हणावे लागेल. पाणी वाचविण्याची मोहिम गेल्या काही वर्षापासून सर्वत्र जोराने सुरू आहेत पण तरी ही पाणी या विषयाबद्दल अजूनही म्हणावी तितकी जागृती झालेली दिसत नाही. पाण्याचा नीट वापर, पाण्याची बचत ही संकल्पना अलिकडच्या काळात पैशाच्या बचती प्रमाणे महत्वाची ठरली आहे. भविष्यात निर्माण होणारी पाणी टंचाई व निर्माण हेणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य सर्व सामान्याना समजून सांगण्याची गरज आहे. 

       महाराष्ट्रात व देशात पाणी प्रश्न गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या अनियमिततेमुळे अधिकच भेडसावू लागला आहे. पाण्याबद्दल जनजागृती हाच त्यावरील उपाय आहे पृथ्वीवर सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे पण यातील सुमारे ९७ टक्के भाग पाणी हे खारे पाणी म्हणजे सागरीपाणी आहे उर्वरीत ३ टक्के पाण्यापैकी २ टक्के पाणी हे बर्फाच्या रूपात आहे फक्त १ टक्के पाणी इतकेच पाणी असे आहे ज्याचा मानवजातीला वापर करता येऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे व वाचविणे अगत्याचे ठरते. आपण ही पाण्याचा वारेमाप अनावश्यक वापर टाळून नळ विनाकारण वाहणार नाहीत, शिळे समजून पाणी फेकले जाणार नाही व वाया जाणारे सांडपाणी झाडा झुडुपांना घालून पाणी काटकसरीने वापरण्यास शिकले पाहिजे. पाणी हे निर्सगाचे देणे झाडे लावून पाणीसंपत्ती वाढवूया व पाणी संपतीचे जिवापाड रक्षण करूया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा