Breaking

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

*शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूरच्या (सुयेक) वार्षिक व्याख्यानमालेच्या विशेष व अभिनव उपक्रमाचे उत्साहात सुरुवात*

 

सुयेक व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.जे.जी.जाधव व अध्यक्षस्थानी
 डॉ. राहुल म्होपरे

*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*


सातारा :  पश्चिम महाराष्ट्रातील अर्थशास्त्र विषयातील संशोधन, लेखन व विकास याकरीता गेली ३० वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या 'शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर ( सुयेक ) या नामांकित अशा शैक्षणिक व संशोधन कार्यावर काम करणाऱ्या  संघटनेच्या वार्षिक व्याख्यानमालेचा   उद् घाटन  समारंभ सोमवार  दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज  येथील बॅ. पी. जी .पाटील सभागृहांमध्ये पार पडला. 

    या व्याख्यानमालेचे उद्घाटन व पहिले पुष्प गुंफण्या करिता रयत शिक्षण संस्थेचे माजी  सचिव प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव उपस्थित होते. त्यांनी या व्याख्यानमालेचे उद्घाटन करून आपल्या पहिल्या व्याख्या नाद्वारे " शेतमाल किंमत विषयक धोरण" या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणांमध्ये त्यांनी "शेतमाल विपणनाची संकल्पना, त्याचे स्वरूप, त्याचे विविध प्रकार, शेतमाल विपणनाच्या विविध पद्धती व त्याद्वारे शेतकऱ्यांची होत असणारी पिळवणूक, मध्यस्थ व इतर घटकांचा असणारा प्रभाव व त्यावर योजावयाचे उपाय ' यासंबंधी उपस्थितांना सांगोपांग मार्गदर्शन केले.  

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुयेकचे कार्यवाह/ खजिनदार डॉ.संजय धोंडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉ. संजय धोंडे यांनी सुयेक मार्फत राबविल्या जाणाऱ्या या व्याख्यानमालेचा उद्देश व सुयेकच्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. 

    सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सुयेकच्या  ३३ व्या वार्षिक  अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे  यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी सुयेकच्या वतीने  शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये या  व्याख्यान मालेद्वारे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ९  व्याख्यानांचे आयोजन विविध सामाजिक व आर्थिक विषयांवर  करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच सुयेक आजवर ज्या पद्धतीने संशोधन, लेखन व शैक्षणिक विकासामध्ये काम करत आली आहे. त्याच पद्धतीने यापुढेही काम करीत राहील असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे संयोजन छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य व सुऐकचे माजी अध्यक्ष प्रो.डॉ. अनिलकुमार वावरे यांनी केले.  या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे डॉ. विठ्ठल शिवणकर तसेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ अर्थतज्ञ व  महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रो.डॉ.जे. एफ.पाटील  उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष प्रा.डॉ.एम.जी.पाटील व सुयेकच्या विद्यमान कार्यकारिणीचे सर्व सदस्य,  सर्व माजी अध्यक्ष, सातारा-सांगली व कोल्हापूर या तीनही जिल्ह्यातील सर्व आजीव सभासद, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त अशा सहभागातून व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा व पहिल्या व्याख्यानाचा समारंभ यशस्वीरित्या पार पडला.

      या व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक व कृतिशील शिदोरी देण्याच्या सुयेकच्या या विशेष व अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा