Breaking

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

*जयसिंगपूर येथे लिला म्हांत्रे प्रतिष्ठाण, मुंबई यांचे वतीने दिव्यांगाना कुबडी वाटप व रोजगार मेळावा संपन्न*

 

कुबडी वाटप करताना प्रमुख अतिथी श्री एन्. डी. म्हात्रेसाहेब 


*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथे मिणचे सभागृहात लिला म्हांत्रे प्रतिष्ठान यांचे वतीने दिव्यांगाचा भव्य मेळावा आयोजित करणेत आला होता. या मेळाव्यास खास करून लीला म्हात्रे प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री एन्. डी. म्हात्रेसाहेब तसेच लीला प्रतिष्ठानचे ट्रस्टी व बनवासी अदिवासी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे सहयोगी श्री रमेश ओवलेकर, जयसिंगपूर गोनसीटीचे अध्यक्ष श्री दादासाहेव चौगुले, श्रीमती अरूणादेवी तात्यासो पाटील, शिरोळ तालुका अपंग संस्थेचे अध्यक्ष श्री आदगोंडा पाटील व श्री दत्त दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष श्री संजय पाटील, ऐनापूरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

     या वेळी कार्यक्रमाचे वेळी संजय चौगुले यांनी प्रमुख अतिथीचा तसेच मान्यवर दिव्यांग बंधु भगिनीचे स्वागत केले व प्रशांत खडके यांनी संस्था करीत असलेल्या कार्याची संपूर्ण माहिती दिली.

   या मेळावेस बहुसंख्य दिव्यांग बंधु भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख अतिथीच्या हस्ते गरीब व गरजू दिव्यांगाना लील म्हात्रे प्रतिष्ठाच्या वतिने कुबडी वाटप व  लघु व्यवसाय करणेसाठी प्रत्येकी ५००० रूपयेचा चेक वितरण करणेत आले, जेणे करून लील म्हात्रे प्रतिष्ठान हे दिव्यांगाना स्वावलंबी बनविणे त्यांना त्यांचा उदरनिर्वाहासाठी प्रवृत्त करून स्वतःच्या पायावरती उभे रहावे हे उददेश घेवून ही संस्था आज महाराष्ट्रभर कार्य करत आहे. या सेवाभावी कार्याची दखल घेवून नाजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांचे हस्ते लील म्हात्रे प्रतिष्ठाचे अध्यक्ष म्हात्रे साहेब यांना पुरस्कार देवून गौरव करण्यात आले.

     आज लील म्हांत्रे प्रतिष्ठाने अनेक दिव्यांगाना स्वावलंबी  बनविणेचे ध्येय समोर ठेवून आज कार्य चालू आहे. तसेच त्यांनी आधुनिक पद्धतीचे कुबडी तयार केले आहे जेणेकरून दिव्यांगाना कुबडी फीडिंग करून कुर्वीही वनविता येते अशा अनेक सोयी लील म्हात्रे प्रतिष्ठने निर्मान केले आहे.

    श्री म्हात्रेसाहेब यांनी आपल्या मनोगतेत दोन्हीही संस्था करीत असलेल्या कार्याविषयी गौरव उद्गार काढले तसेच त्यांनी दिव्यांगाना समाज्यात स्थान निर्माण व्हावे, इतरांचे प्रमाने त्यांचे जीवन सुखकर व्हावे त्यांच्या अडचणी समजावून घेवून त्यांना कृत्रिम साहीत्य वाटप करणे, त्यांना व्यवसाय करणेसाठी चालना देणे, आर्थिक मदतीचा हात देवून त्यांना आत्मनिर्भय वनविने हा मुख्य हेतू असलेचे सांगितले. दिव्यांगांनी कशाप्रकारे स्वावलंबी बनावे छोटे छोटे उदयोग कसे करावे व कोणते करावे सरकार कडून कोणत्या व्यवसायास किती सबसिडी मिळते इ. विषयांवर रोजगार प्रशिक्षण मेळावा घेणेत आले जेणेकरून इतरांचे वर अवलंबून न राहता स्वतः स्वावलंबी बनता येते हे सांगणेत आले आज या मेळावेत महाराष्ट्रभर फिरून माहिती घेण्याचे काम चालू असलेचे नमूद करून प्रत्येक तालुका स्थरवर ज्या दिव्यांग संस्था अथवा सेवाभावी संस्था, ट्रस्ट यांचे वतिने हा उपक्रम राववत असलेचे सांगितले. दिव्यांगाना काही समस्या असतील तर त्यांनी प्रतिष्ठान संस्थेशी संपर्क करणेचे आव्हान केले. आज पर्यंत कित्येक दिव्यांगाना आधुनिक पद्धतीची कुवडी व व्यवसाय करणेस हातभार लावलेचीही सांगितले,

   यावेळी गीनसीटी रोटरीचे अध्यक्ष दादासाहेब चौगुले व रमेश ओवलेकर यांनी संस्था करीत असलेल्या कार्यचे कौतूक करून दिव्यांगांना मदतीचा हात देत संस्था करीत असलेल्या कार्यत लागेल ती मदत करू असे सांगितले.

   यावेळी उपस्थित श्री संस्थेचे उपाध्यक्ष माळीसाहेब, सुनिता पाटील, महावीर मगदुम, श्री दत्त दिव्याग संस्था व शिरोळ तालुका अपंग संस्थेचे कार्यकारी उपस्थित होते तसेच सुशिला पोवार यांनी कार्यक्रमाचे शेवटी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा