सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली महाविद्यालयांमध्ये जागतिक पुस्तक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.ज्यामध्ये बी.एड प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतः वाचलेल्या पुस्तकांचे त्यांच्या दृष्टीने परीक्षण/समीक्षण/विश्लेषण व त्यावर चर्चा घेण्यात आली.
![]() |
![]() |
यामध्ये मृत्युंजय, ययाति, झोंबी, सिक्रेट, थँक यु मिस्टर ग्लाड, सौंदर्य अनुभव, व्यक्ती आणि वल्ली, जुगाड, कुचल्या, आपण माणसात नाही, शिवाजी - द मॅनेजमेंट गुरू, एक होता कार्व्हर आदी पुस्तकांवर समीक्षण व चर्चा करण्यात आली.
पुस्तके कोणती निवडावी तसेच त्याचे परीक्षण कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करावे याबाबतचे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या संयोजिका ग्रंथपाल सौ. संध्या यादव यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ.बी.पी. मरजे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ .गायत्री जाधव यांनी तर आभार बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थी आकाश जाधव याने मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा