Breaking

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

*पुरुष प्रधान संस्कृतीमुळे महिलांची होते अधिकारांची पायमल्ली : अॅड. मेघा ठोंबरे*


मार्गदर्शन करताना अँड. मेघा ठोंबरे


*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपर येथे अंतर्गत तक्रार निवारण समिती व ॲटी रॅगिंग  हेल्पलाईन समितीच्या वतीने 'कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ सरंक्षण अधिनियम २०१३' या विषयावर बोलताना अॅड. मेघा ठोंबरे यांनी महिलांनी आपल्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. अॅड. ठोंबरे यांनी शाळेत व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थिनी चुकीच्या गोष्टींना कश्या भुलतात व अपमार्गाला जातात, तसेच महिलांची वेश्या व्यवसायासाठी होणारी मानवी तस्करी, स्त्री भृणहत्या, महिला सक्षमीकरण व भारतीय संविधान व संविधानातील महिलांसाठीच्या विशेष तरतुदीविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांनी महाविद्यालयीन कमिटी व विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयी आपले मत प्रकट केले.

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ. सौ. माधुरी शिंदे यांनी केले. अतिथी परिचय अॅड. उषा पाटील यांनी करून दिला. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ विनोदिनी शिखरे या प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होत्या. आभार सौ. पद्मजा पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन कु. प्रीती केरीपाळे हिने केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा