Breaking

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव ह्या ९६२२६ मतांनी विजयी*

 

उत्तर कोल्हापूर पोटनिवडणूक विजेत्या श्रीमती जयश्री जाधव


*हेमंत कांबळे  : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकी मध्ये काँग्रेसच्या उमेदवार  श्रीमती जयश्री जाधव ह्या ९६२२६ मतांनी विजयी झाल्या आहेत.त्यांनी भाजपचे उमेदवार  सत्यजीत कदम यांचा १८८०० मतांनी पराभव केला. सत्यजीत कदमांना ७७४२६ मत पडली असून जयश्री जाधव ह्या महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूकित विजय झाल्या आहेत.

    अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची निवडणूक असलेने संपूर्ण  राज्यासह जिल्ह्याचे ह्या निवडणूकी कडे लक्ष लागून राहीले होते. आगामी होणाऱ्या निवडणुकीची एक प्रकारे चाचणी परीक्षा होती.कोल्हापूर मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा