Breaking

रविवार, १७ एप्रिल, २०२२

*देशात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेससह इतर पक्षांची आगेकूच ; भाजप पराभूत*

 

देशात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल


  लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसत काँग्रेससह इतर पक्षांची सरशी झाली आहे.

      पश्चिम बंगालमधील लोकसभेचा आसनसोलचा बालेकिल्ला शत्रुघन सिन्हा यांनी बहुमतानी राखला आहे व बालीगंज विधानसभेची जागा तृणमूल काँग्रेसच्या बाबुल सुप्रियो यांनी राखली. बिहार मधील बोचहान विधानसभेसाठीच्या पोटनिवडणुकीत लालूंचा राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अमर पास्वान विजय झाले. महाराष्ट्रातील तर कोल्हापूर साठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात जयश्री जाधव यांनी बाजी मारली. छत्तीसगड मध्ये खैरागड येथील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या  यशोदा वर्मा या विजयी घोषित झाल्या आहेत.

     या पोटनिवडणुकीत काँग्रेससह इतर पक्षांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपच्या गोटात नाराजीचे सूर उमटत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा