Breaking

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

*गॅस गिझर वापरकर्त्यानो ?... सावधान!*


       गॅस गिझरमुळे होणाऱ्या दुर्घटना या प्रामुख्याने बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसल्याने होतात. त्यामुळे बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी 'एक्झॉस्ट फॅन' बसवून घेण्याची आवश्यकता आहे.

     गॅस गिझरमुळे होणाऱ्या दुर्घटना या प्रामुख्याने बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसल्याने होतात. त्यामुळे बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी 'एक्झॉस्ट फॅन' बसवून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बाथरूममध्ये ऑक्सिजन अभावी होणाऱ्या दुर्घटना टाळणे शक्य होईल.

        अंघोळीसाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाला. कोथरूड येथील कुंबरे पार्क येथे ही घटना घडली होती गॅसगिझरमुळे गुदमरून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

   या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यावी, याबाबतची माहिती घेतली. बाजारात इलेक्ट्रिक व गॅस गिझर उपलब्ध आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक गिझरला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, गॅस गिझरलाही चांगली मागणी आहे.

गॅस गिझरमुळे वाफ तयार होते. बाथरूमधून वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्यास मोठ्या प्रमाणावर वाफ साठत जाते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, तेथे कार्बन डायऑक्साईड तयार होण्यास सुरवात होते. त्यानंतरही गॅस गिझर चालूच राहिल्यास ऑक्सिजन नाहीसा होऊन संपूर्ण कार्बन डायऑक्साईड तयार होतो.त्यामुळे माणसाचा श्वास गुदमरतो, असे तज्ज्ञ सांगतात.

         साधारणपणे बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असते. मात्र, बहुतांश ठिकाणी ती बंद केली जाते. त्यामुळे आतील वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. यावर उपाय म्हणून बाहेरील हवा आत घेणारा आणि आतील हवा बाहेर सोडणारा एक्झॉस्ट फॅन बाथरूममध्ये बसवावा कोणती खबरदारी घ्याल?

       गॅस गिझर खरेदी केल्यानंतर त्याची फिटिंग प्रशिक्षित व्यक्तींकडून योग्य ठिकाणी करून घ्यावी.गॅस पुरवठ्यासाठी फक्त रबरी पाइप न वापरता त्याला कॉपर फिटिंग करून बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन बसवावा किंवा किमान खिडकी उघडी ठेवावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा