Breaking

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

शालेय शैक्षणिक साहित्य करतील शिक्षण सोपे व मजेशीर - सहायक शिक्षक द्वारकानाथ भोसले. - पुतळाबेन शाह बीएड कॉलेज मध्ये एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

 

स.शिक्षक - द्वारकानाथ भोसले


       बुधवार दि. २० एप्रिल रोजी श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे एकदिवसीय शालेय शैक्षणिक साहित्य बनवण्याची कार्यशाळा पार पडली. सहायक  शिक्षक द्वारकानाथ भोसले यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध कलाकृती बनवण्याचे मार्गदर्शन केले.

विविध कलाकृती 


         द्वारकानाथ भोसले हे कुमार विद्या मंदिर २, शिरोली येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अनेक शाळा तसेच सरकारी प्रशिक्षण शिबिरात शालेय शैक्षणिक साहित्य बनविण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शालेय शैक्षणिक साहित्य शिक्षण सोपे व मजेशीर बनवतात, तसेच विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करून घेतात, असे प्रा.भोसले मत मांडतात.

विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग


        या कार्यक्रमात द्वारकानाथ भोसले यांनी  बोलकी टोपी,बोलका तक्ता, थ्रीडी तक्ता, मॅजिक स्लेट/पाटी, बॉक्स, बोलका स्तंभ, फ्लॅश कार्ड, जंपक चित्र, शब्दचक्र ई. कलाकृती तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती


        या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. बी.पी. मरजे,  प्रा.गायत्री जाधव, प्रा.डॉ.युवराज पवार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर तसेच बीएड प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. 

      प्रा.गायत्री जाधव यांनी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाची ओळख करून दिली तर प्रथम वर्ष विद्यार्थी शीतल पाटील यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा