Breaking

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

*जयसिंगपूर घोडावत कन्या महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील विद्यार्थिनी अल्फा खांडेकर हिची पी.एस.आय पदी निवड*

 

अल्फा खांडेकर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. डी.बी.कर्णिक


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूरची विद्यार्थिनी कु. अल्फा सुदाम खंडेकर (सौ.आरती महेंद्र कांबळे) हिची पीएसआय पदी निवड झालेबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्रचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

        कन्या महाविद्यालयाच्या हिंदी विभागातून बी.ए.ची पदवी संपादणूक केलेली कु. अल्फा खांडेकर ही धरणगुत्ती गावची कन्या असून तिचे सासरचे नाव सौ. आरती महेंद्र कांबळे आहे.त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बारावी नंतर त्यांचा विवाह झाला. मुलगी झाल्यानंतर त्यांनी अभ्यासास सुरूवात केली. महाविद्यालयीन व पीएसआयचा अभ्यास करताना पती महेंद्र कांबळे यांची खंबीर साथ मिळाली. दोघांनी मिळून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तीन वर्षापूर्वी पती महेंद्र कांबळे यांची पीएसआय पदी निवड झाली. सध्या ते पुणे येथे कार्यरत आहेत. सात वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाल्यानंतर पीएसआयपदी निवड होणे ही जयसिंगपूर परिसरातील सर्व विद्यार्थिनी व महिलांसाठी एक प्रेरणादायी व आदर्श उदाहरण आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्णिक सरांनी खडतर परिश्रम, जिद्द व यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

       तिच्या प्रेरणादायी सुयशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा