Breaking

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजच्या १२ विद्यार्थ्याची पुणेस्थित एसपीसील इन्फोटेक कंपनीत निवड*


निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे चेअरमन, पदाधिकारी व प्राचार्य

*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूरः अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये एसपीसील इन्फोटेक पुणे या कंपनीचा प्लेसमेंट कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्प मध्ये जयसिंगपूर कॉलेजच्या १२ विद्यार्थ्यांची एसपीसील इन्फोटेक पुणे या नामवंत कंपनी मध्ये निवड झाली आहे अशी माहिती प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जी.एच.निकम यांनी दिली. 

      या निवडीकरिता एसपीसील इन्फोटेक पुणे या कंपनीचे श्री संजय शाह आणि त्यांच्या टीमने दोन दिवस लेखी परीक्षा, टेकनिकल टेस्ट व वैयक्तिक मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली. या मुलाखती मध्ये कॉलेजचे विकास चुडमुंगे, भक्ती बिडकर, प्रणव वाणी, प्रणव खोत (बीसीए व बीसीएस विभाग) विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच सुरैया मुल्लानी, सोनाली पाटील, सुप्रिया कुन्नुरे, प्रणाली खामकर (बी.एस्सी. केमिस्ट्री), वर्षा पवार, ऋतुजा जाधव (एम.एस्सी. केमिस्ट्री), आणि सुमैय्या मुल्ला, श्रद्धा संकपाळ (बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स) या विद्यार्थ्यांची पुणेस्थित एसपीसील इन्फोटेक या नामवंत कंपनी मध्ये निवड करण्यात आली आहे.

     या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. सदरचा प्लेसमेंट कॅम्प आयोजित करण्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, संस्थेचे सदस्य प्रा. आप्पासाहेब भगाटे, मा.इंगळे सर व संस्थेच्या लोकल कमिटीच्या सर्व सदस्यानी मार्गदर्शन केले. या कॅम्पचे आयोजन प्र.प्राचार्या प्रा.डॉ.सौ.मनिषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जी.एच. निकम, डॉ. पी. पी. चिक्कोडे, डॉ. एस आर.साबळे, प्रा.आर.डी. शिंदे, प्रो.एन एल.कदम, प्रा. बी.ए.पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

       सदरच्या निवडीने या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा