![]() |
हिवताप विषयी जनजागृती करताना : डॉ.पांडुरंग खटावकर |
*विक्रांत माळी : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जनतारा हायस्कूल जयसिंगपूर येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी मा.डॉ. पांडुरंग खटावकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा हिवताप मुक्त करण्यासाठी जिल्हाभर हिवताप जनजागृती मोहिमेचा आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून जयसिंगपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वतीने जयसिंगपूरच्या जनतारा हायस्कूलमध्ये ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जनतारा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते.
प्रसिद्ध धन्वंतरी व जिल्हा हिवताप अधिकारी मा.डॉ. पांडुरंग खटावकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आपला परिसर हिवताप व डेंगू मुक्त करण्यासाठी हिवताप या आजाराविषयी संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे यासंदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हिवतापावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास पी .एन. काळे,एस.एस.आलासकर व डी.बी गायकवाड तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्री आलासकर यांनी गाण्याच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा