Breaking

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

*स्क्रीन टाईम कमी करण्याची एक युक्ती*


    आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्मार्ट फोनच्या सेटिंगमध्ये डिजिटल वेबबीइंग अँड पॅरेंटल कंट्रोल हा ऑप्शन असतो. फोनच्या सेटिंगमध्ये गेल्यावर डिजिटल वेल बीइंग असा ऑप्शन तुम्हाला दिसेल. अँड्रॉईड बरोबर आयफोनमध्येही अशी सेवा असतेच. जर स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर हा पर्याय वापरायला शिकायलाच हवं.

यात काय असतं ते बघू या!

) आपल्याला आपला सोशल मीडिया ओटीटी चॅनल्स आणि इतर इंटरनेटवरचा नेमका स्क्रीन टाइम समजू शकतो.


२) आपण आपला स्क्रीन टाईम सेट करू शकतो. दिवसाला किती वेळ मोबाईल बघणार, स्क्रीन टाईम हवा हे ठरवून तो वेळ सेट करायचा. म्हणजे मग तितका वेळ झाला की फोन लगेच आठवण करून देतो.


३) फोन मधल्या निरनिराळ्या ॲप्ससाठीही असंच टायमर सेट करता येतं.

४) यात एक फोकस मोड असतो. जेव्हा तुम्हाला काही महत्त्वाचं काम करायचं आहे तेव्हा या फोकस मोडमधलं वर्क टाईम हा ऑप्शन चालू करायचा. फोनची अनावश्यक लुडबूड आपोअप बंद होते. त्यातच, मी टाईम असाही पर्याय आहे. हा चालू केला की सगळे अॅप्स ठरावीक काळासाठी ब्लॉक होतात आणि आपला पूर्ण फोकस आपण करीत असलेल्या गोष्टीवर होऊ शकतो.


५) बेड टाईम मोड चालू केला की स्क्रीनचा जो लाईट असतो तो ग्रे होतो. म्हणजे आपल्या डोळ्यांना कमी त्रास होतो. शिवाय नोटिफिकेशन आणि इतर फोन कॉल्स या सगळ्या गोष्टी म्युट होतात.


   आपला स्क्रीन टाईम मॅनेज करणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्यासाठीची अनेक साधन उपलब्ध आहेत. ती वापरायला सुरूवात करायला हवी. अनेकदा आपण फोन विकत घेतो. त्यात आपली नेहमीची अॅप्स डाऊनलोड करतो. पण, त्या फोनच्या सायबर सिक्युरिटीबद्दल आणि आपल्या डिजिटल वेलबीइंगबद्दल जराही विचार करीत नाही. अनेकदा अशा काही सोयी आपल्या फोनमध्ये आहेत हेही आपल्याला माहित नसतं. कारण फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन काय काय सेवा देऊ केल्या आहेत हेही आपण बघत नाही. स्क्रीन टाईम कमी करण्याची तयारी आपली आपल्यालाच करावी लागणार आहे. त्याची सुरूवात आपल्या फोनपासून आजच करता येणं सहज शक्य आहे. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डिजिटल वेल बीइंगचा पर्याय शोधा..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा