![]() |
कुरुंदवाड येथे जयसिंगपूरच्या जावईस मारहाण |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील जावयास मेहुणा व सासर्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सागर भिकाजी जोशी वय वर्ष ३६ रा.५२ झोपडपट्टी शाहुनगर जयसिंगपूर याने कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी सासरा सुधाकर माने, मेव्हणा अक्षय सुधाकर माने,प्रशांत चव्हाण, गौतम एडके व अन्य अनोळखी संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील गोठणपूर गल्लीतील सुधाकर माने यांची मुलगी श्वेता हिच्याशी सागर जोशी यांचा विवाह झाला होता.ती आठ महिन्यापासून माहेरी कुरुंदवाड मध्ये राहत होती. प्रशांत चव्हाण यांच्या मध्यस्थीने पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी कुरुंदवाड येथे रविवारी दुपारी बैठक बोलविण्यात आली होती. बैठक सुरू असताना सागर जोशी यांना अक्षय माने, सुधाकर माने या दोघांनी आम्ही कोर्टात पोटगी दावा दाखल करणार आहे अशी दमदाटी करून शिवीगाळ करत या लाथाबुक्क्यांनी काट्यानी व पट्ट्यानी बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या मारहाणीत सागर जोशी यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईलची मोडतोड झाली असून अंदाजे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन गहाळ झाल्याची फिर्यादीत म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा