![]() |
पाकिस्तानी मंत्री हिना रब्बानी खार |
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी नवीन मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली असून, सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण झाला आहे.
या यादीत पाकिस्तानच्या सुपर गॉर्जियस राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या हिना रब्बानी खार यांच्याही नावाचा समावेश आहे. एकीकडे कट्टर धार्मिक देश म्हणून ओळख करू पाहणाऱ्या पाकिस्तानातील कट्टरपंथीय घटक एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला आधुनिक जगाची कास धरून पुढे जाणारी पिढीही पाकिस्तानात आहे. त्यापैकीच हिना रब्बानी ह्या स्टायलिश राजकारणी आहेत.
हिना रब्बानी केवळ राजकारणातच टॉपर नाही तर फॅशनच्या बाबतीतही देशातील अभिनेत्रींना टक्कर देतात. हिना खार यांना पाकिस्तानमध्ये स्टाइल आयकॉन मानले जाते. हिना खार यांच्या सूटपासून ते सनग्लासेस आणि बॅगपर्यंत सर्व काही चर्चेत असते.
हिना रब्बानी खार या पाकिस्तानच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा असून, पाकिस्तानातच नव्हे, तर जगभर त्यांची ओळख आहे. हिना रब्बानी खार २०११ ते २०१३ पर्यंत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या. हे मंत्रिपद मिळालेल्या हिना या पाकिस्तानच्या पहिल्या महिला राजकारणी होत्या. इतकेच नाही तर सर्वात कमी वयात हे मंत्रीपद मिळवण्याचा विक्रमही हिना यांच्या नावावर आहे.
४४ वर्षीय हिना रब्बानी खार यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.२००३ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दक्षिण पंजाबच्या मुझफ्फराबाद जिल्ह्यातून त्यांनी दोनदा निवडणूक जिंकली.
भारत दौऱ्यादरम्यान हिना रब्बानी खार यांनी 7 लाखांची डिझायनर बॅग कॅरी केली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. हिना खार यांना लुई व्हिटॉन, फेरागामो, प्राडा यांसारख्या महागड्या आणि लक्झरी ब्रँडच्या बॅग्ज आवडतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा