Breaking

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

*जयसिंगपूर येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरघोस कार्यक्रमाने ८ एप्रिल ते रविवार १० एप्रिल २०२२ रोजी संपन्न होणार*

 

शाहूनगर स्थित श्री महालक्ष्मी देवीची यात्रा

*विक्रांत माळी  : विशेष प्रतिनिधी*

  

 जयसिंगपूर :  शाहूनगर स्थित श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अखंडितपणे भरगच्च कार्यक्रमाने संपन्न होत असते. या यात्रेस ३४ वर्षे पूर्ण होत असून कोरोना काळातील अपवाद सोडला सर सदर यात्रा अखंडितपणे सुरू आहे.

   दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दि. शुक्रवार ८ एप्रिल २०२२ ते रविवार १० एप्रिल २०२२ अखेर यात्रा भरवली जाणार आहे. या यात्रेनिमित्त अभिषेक, महापूजा, गोंधळ, पालखी, मिरवणूक, महाप्रसाद व करमणुकीचा कार्यक्रम होणार असल्याबाबत त्याचबरोबर यात्रेचे उत्तम नियोजन झाल्याबाबतची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    शुक्रवार दि. ०८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी अभिषेक व महापूजा होणार आहे तसेच रात्री वामन गोंधळी यांचा गोंधळी गाण्याचा कार्यक्रम होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे शनिवार दि. ०९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी अभिषेक व नैवेद्य तसेच दुपारी भव्य पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात येणार असून रात्री महाप्रसादाचे वाटप होणार आहे. रविवारी दि. १० एप्रिल २०२२ रोजी करमणुकीचा कार्यक्रम होत आहे. यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष पै. विठ्ठल मोरे, अर्जुन देशमुख, शैलेश आडके, पत्रकार अजित पवार, अभय माळी, पोपट सुरवंशी, प्रकाश साळोखे, गुरुदेव माळी, प्रकाश घोडके, सोमनाथ माळी, श्रीपती माळी  यांच्यासह यात्रा व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. सदर यात्रा शांततापूर्ण व प्रसन्न वातावरणात यशस्वी करण्यासाठी सर्व भाविकाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा