Breaking

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.सुनिल चौगुले 'उत्कृष्ट शिक्षक' पुरस्काराने सन्मानित*

 

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त
प्रा. सुनील धनपाल चौगुले

*प्रा. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर  :  नेहरू युवा केंद्र, भारत सरकार संलग्न, वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था,इचलकरंजी आयोजित महाराष्ट्र लोकरत्न वसुंधरा गौरव पुरस्कार २०२२ विविध  क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार आयोजित करण्यात आले. यामध्ये जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूरचे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक श्री सुनिल चौगुले यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार ह.भ.प तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने या होत्या.

        प्रा. सुनिल चौगुले हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. त्यांनी विद्यार्थिदशेपासून शैक्षणिक गुणवत्तेची चुणूक दाखवत एक हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून आपली प्रतिमा तयार केली होती. उत्तम निवेदक, प्रभावी व अभ्यासपूर्ण वक्तृत्वशैली या माध्यमातून त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली असून त्याचा निश्चित लाभ समाजातील विविध घटकांना होत असतो. समाजातील विविध घटकांशी नाळ जोडून त्यांच्याशी आपुलकी व विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.

         भूगोल विषयाचे अध्यापक म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून त्यांनी आपल्या विषयाचा लाभ विद्यार्थ्यांनी व्हावा यासाठी त्यांची धडपड असते. एका प्रतिष्ठित व सामाजिक भान असलेल्या सर्कल ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ते सातत्याने समाजातील पिचलेल्या व गरजू लोकांना मदत करण्यामध्ये ते सातत्याने कार्यरत असतात. कोरोना महामारीच्या काळात समाजातील वंचित घटकांसाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार योग्य व खऱ्या शिक्षकाला मिळाल्याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत.

     त्यांनी आपल्या २१ वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या शैक्षणिक कार्याचा हा सन्मान असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा