मयत महिला कॉन्स्टेबल योगिनी सुकुमार पोवार |
कोल्हापूर : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल योगिनी सुकुमार पोवार (वय वर्ष ३६, रा. पोलीस लाईन कसबा बावडा) यांनी कौटुंबिक वादातून गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये आज रविवार दि.१७ एप्रिल,२०२२ रोजी दुपारच्या वेळेस ही दुर्देवी घटना घडली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी लिहिलेली चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.
कौटुंबिक वादातून महिला कॉन्स्टेबल पोवार यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहूपूरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
या घटनेने कसबा बावड्याच्या पोलिस लाइन मध्ये मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुर्दैवी शेवट ही आमची विद्यार्थ्यांनी होती. अत्यंत धाडसी मुलगी होती. भावपूर्ण श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा