![]() |
आपचे विद्यमान खासदार व माजी क्रिकेटपटू मा.हरभजन सिंग |
दिल्ली : सुप्रसिद्ध फिरकी गोलंदाज माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने शनिवार मोठी घोषणा केली आहे. राज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्याच्या लेकीच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याची घोषणा हरभजन सिंह याने केली आहे. हरभजन सिंह याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. भज्जीच्या या निर्णायानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भज्जीच्या निर्णायचं स्वागत करण्यात आले आहे.
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. नुकतीच भज्जीने खासदार म्हणून शपथ घेतली. त्यानंतर कामकाज सुरु केल्यानंतर हरभजन सिंह याने मोठं पाऊल उचललं आहे.
आप पक्षाने दिल्ली व अन्य ठिकाणी केलेल्या कामाच्या माध्यमातून देशभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळत असताना विद्यमान आपचे विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांच्या या घोषणेने त्यांचे व त्यांच्या पक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा