![]() |
विद्या मंदिर शाळेचा पाया खुदाई समारंभ |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
नृसिंहवाडी : सन २०१९ च्या महापुराने गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत नादुरुस्त झालेली होती .त्यामुळे तिचे निर्लेखन करण्यात आले परंतु अद्यापही शाळेची इमारत झाली नव्हती ,परंतु जिल्हा परिषद सदस्या परविन दादेपाशा पटेल यांच्या अथक प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या चीकाटी तून शाळेला दोन खोल्यांची इमारत मंजूर झाली, त्या इमारतीचे भूमिपूजन व पाया खुदाई समारंभ माननीय श्री दादेपाशा पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ रुपाली मगदूम तसेच श्री दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष माननीय श्री सदाशिव पुजारी, गटशिक्षणाधिकारी दिपक कामत साहेब ,धनाजीराव जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे ग्रामपंचायत सदस्य अमोल विभुते, तानाजी निकम पूनम जाधव ,विद्या कांबळे ,मंगल खोत ,चित्रा सुतार तसेच गावातील सन्माननीय व्यक्ती उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा पूजा जमदग्नी सदस्य चिन्मयी कोडणीकर, स्नेहल कोडणीकर, मानसी जिरगे ,अंजली पाटील क्रांती सुतार ,पांडुरंग सुंकी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ,कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या शिक्षिका विजया पलंगे, मनीषा लठ्ठे, ताराराणी चावरे वैशाली पाटील तसेच शिक्षक तुकाराम पाटील ,मधुकर काळेल यांच्याबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी परिश्रम घेतले ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर मोरबाळे व सदस्य गुरुदास खोचरे यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे आभार उदय गायकवाड सर यांनी मानले तर सूत्रसंचालन दर्शन वडेर यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा