![]() |
ग्रामपंचायत हेरवाडचा पुरोगामी ठराव संमत |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
*हेरवाडच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संमत*
शिरोळ : महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथेवर म्हणजे पतीच्या निधनानंतर विधवा समजून तिची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे यांसह अन्य प्रकारे छळ करण्याची प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून याबाबतचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे.
खरंतर विधवा महिलांच्या प्रश्नावर पूर्वी पासून अनेकांनी खूपच चांगले काम केले आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या कामाला तोडच नाही. कालवश पद्मश्री डॉ.नरेंद्र दाभोलकर व त्यांच्या टीममुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. विधवा महिलांच्या पुनर्विवाह ,आरोग्य, आर्थिक, मुलांचे शिक्षण, अलीकडे कोरोना मुळे झालेल्या विधवा महिला यांचा प्रश्न दुर्लक्षीत राहिला आहे. *विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलले पुरोगामी पाऊल*हजारो वर्षांपासून आलेल्या अनिष्ट प्रथेला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हा विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान प्रेम बहुुददेशीय संस्थेच्या माध्यमातून प्रकाश झिंजाडे हे काम करीत आहेत. राबविण्यात येत आहे.
हेरवाड गावात ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोन महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरणार आहे. लवकरच शिरोळ तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
--------------
इतर ग्रामपंचायतींनी पुढकार घ्यावा
विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी ही प्रथा बंद करण्याची गरज आहे. या अभियानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव संमत करण्यात आला असून शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी सदर ठराव संमत करून शासनाकडे पाठवावा.
- सुरगोंडा पाटील, सरपंच, हेरवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा