Breaking

शुक्रवार, २७ मे, २०२२

प्राथमिक आरोग्य केंद्र,जयसिंगपूर मधील ऑफिस मधे निघाला धामण जातीचा साप. प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी केला रेस्कू


मालोजीराव माने - कार्यकारी संपादक


साप पकडून झाल्यावर सापाबद्दल माहिती देताना अक्षय मगदूम


जयसिंगपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र,जयसिंगपूर येथे ऑफिसमध्ये आज दुपारी धामण जातीचा बिनविषारी साप निघाला. अचानक निघालेल्या ५ फुटाच्या सापामुळे कर्मचाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली. पण प्रसंगावधान राखत शांत राहून वैद्यकीय अधिकारी पी. खटावकर आणि सहकारी यांनी जयसिंगपूर येथील प्राणीमित्र अक्षय मगदूम व अमोल ढेंगे यांना बोलावले. प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी तात्काळ तेथे जाऊन तो धामण जातीचा बिनविषारी साप पकडला. सोबतच प्राणीमित्र अक्षय यांनी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून त्या सापाबद्दल माहिती दिली.


  धामण सापाबद्दल माहिती -


संग्रहित छायाचित्र



 रंग - पिवळसर, काळसर, राखाडी इत्यादी रंगात आढळतो.

लांबी - साधारण लांबी ६-८ फूट (अधिकतम १२-१३ फूट वाढते )

स्वभाव - एकदम लाजाळू/ घाबरट. मनुष्यापासून लांब राहते. 

खाद्य - उंदीर हे प्रमुख खाद्य ( म्हणून इंग्रजीमध्ये धामण सापाला रॅट स्नेक ( rat snake ) म्हणतात.

आढळ - महाराष्ट्रात सर्वत्र, जिथे उंदीर असेल येथे हा साप येतो.

प्रजनन - उन्हाळ्यात मिलनाचा काळ असतो, मादी साप १०-२० अंडी घालते.

    या सापापासून कोणताच धोका नसून उलट फायदाच आहे. कारण हा साप निरुपद्रवी उंदरांना कमी करतो. घरात अडगळ झाल्यास तसेच उंदराचे प्रमाण वाढल्यास हा साप घरात येण्याची शक्यता असते . तसेच उन्हाळयात गारव्याला हा साप घरात / बाथरूम मधे येण्याची शक्यता असते. हा साप जरी बिनविषारी असला तरी याला पकडण्याचा प्रयत्न करू नये, आपल्या ओळखीचा सर्पमित्राला बोलवावे. किंवा वनविभागाच्या १९२६ वर संपर्क करावा.

             अक्षय मगदूम, प्राणीमित्र - जयसिंगपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा